कल्याण : दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी कल्याण येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या केंद्रात गणेश उत्सवाच्या निमित्ताने एक करमणुकीचा कार्यक्रम म्हणून काव्यवाचन कार्यक्रमांचे आयोजित केले होते. आयुष्याच्या संध्याकाळी जीवनातील अनेक बऱ्या वाईट घटना विसरुन चांगले आनंददायी जीवन कसे जगता येईल याचा विचार करायला हवा. असे आपले मनोगत व्यक्त करताना सदर कार्यक्रमात राजेश साबळे, ओतूरकर म्हणाले.
उगाचच दुःख उगाळत बसून चांगले, सुंदर जीवन जगत असताना काही वेळा आपणच आपले सुख भोगायचे विसरुन छोटी मोठी दुःख आठवून जीवन निराशाजनक करतो. त्यापेक्षा चांगल्या गोष्टींच्या आठवणीत सुख शोधावे म्हणजे जीवन आनंददायी होते.
सदर कार्यक्रमासाठी विरंगुळा संघाच्या विनंती वरून कल्याण येथील काव्यप्रेमी शिक्षक मंच चे राज्य समिती सदस्य कवी प्रमोद बाविस्कर यांनी एक छोटेखानी काव्यवाचन कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
यावेळी काव्यप्रेमी शिक्षक मंच चे कोकण विभागीय अध्यक्ष आणि ठाण्याच्या नीलपुष्प साहित्य मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक राजेश साबळे, ओतूरकर, कल्याण येथील कवी, वात्रटीकाकर मकरंद वांगणेकर, वर्ल्ड विजन संस्थेचे संपादक प्रा. नागेश हुलवळे, कल्याणचे ज्येष्ठ कवी लीलाधर महाजन आणि कार्यक्रमांचे निवेदक तसेच काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्य सदस्य कवी प्रमोद बाविस्कर यांनी काव्य वाचनात सहभाग घेवून आई आणि बापाचे महती सांगणाऱ्या, अभंग, पर्यावरण, प्रेम, पाऊस या विषयावरील सुंदर कविता गाऊन सादर करण्यात आल्या त्यामुळे. हा कार्यक्रम एक संगीतमय सोहळा झाला.
विरंगुळा संस्थेतील ज्येष्ठ मंडळींनी खुप छान नियोजन यानिमित्ताने केले होते. त्याबद्दल विरंगुळा संघातील सर्व नागरिकांचे कौतुक करायला हवे की, ज्यामुळे साहित्यिकांना आपल्या कविता सादर करण्याची संधी उपलब्ध करुन दिली.कार्यक्रमासाठी विरंगुळा संघातील श्री.वैद्य, सौ पसारे, श्री.पुराणिक, श्री.सोनटक्के, निशानदार ताई, परांजपे ताई, श्री.जोशी, श्री.गांगरडे यांची विषय सहकार्य लाभले. त्याबद्दल विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघाचे मनापासून आभार!!
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुंदर अशी प्रार्थना झाल्यावर उपस्थित पाहुण्यांच्या विरंगुळा संघाच्या वतीने यथोचित स्वागत करुन सर्वांचा परिचय करुन देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित कवींना पुष्गुच्छ देवून सन्मानीत करण्यात आले. आणि माऊलीच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. अतिशय सुंदर असा सुखद काव्य वाचक सोहळा संपन्न झाला.
शब्दांकन
राजेश साबळे,ओतूरकर
मो. ९००४६७४२६३



Post a Comment
0 Comments