Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत



0 चारोळ्या 0

जगाल कसेही पण -

जगण्याला अर्थ हवा 

आपले जीणे पाहून -

जगाला वाटावा हेवा


मनाचा मोठेपणाच-

मनाचा मोठा शृंगार

संयम आणि सभ्यता

हेच तिचे अलंकार


जगाया शिकाया हवं 

मराया शिकाया हवं

जसं प्रसंग येईल

तसं वागायला हवं


जगात आलो म्हणजे

मनमोकळं जगावं

मनमोकळं हसावं

आणि बिंदास्त मरावं


आजचे राजकारण 

खूपच आहे विचित्र

कुठं काय चाललंय-

स्पष्टच होईना चित्र

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना.कामून )

 मो.नं . 07620540722

Post a Comment

0 Comments