Type Here to Get Search Results !

समाधान दिनकर लोणकर यांना अमरदीप कर्तृत्व गौरव पुरस्कार जाहीर.



अमरदीप बालविकास फौंडेशन व महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्था नवीमुंबईच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो. 2024 या वर्षीच्या राज्यस्तरीय अमरदीप कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024 साठी हिंगोली जिल्ह्यातील राहोली (बु) येथील मा.समाधान दिनकर लोणकर (मुंबई पोलीस) यांची निवड करण्यात आली आहे.

मा.समाधान लोणकर यांच्या साहित्यिक,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

साहित्य मंदिर, सेक्टर - 06,वाशी नवीमुंबई या ठिकाणी दि. 22/09/2024 रविवार रोजी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे निवडपत्र त्यांना मा.डॉ.शैलेंद्र पवार (प्रमुख संयोजक),मा.सौ.सलमा खान (संयोजिका)यांनी दिले आहे.

राज्यस्तरीय अमरदीप कर्तृत्व गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मा.समाधान लोणकर यांचे कुटुंबीय, नातेवाईक, गावकरी व मित्र परिवार यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments