Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत.



 चारोळया 

मंदिराचे लाडू खातो

मस्जिदीचे खीर खातो

भूक माझी महत्वाची

भुकेला धर्म मानतो


नको मंदिर - मस्जिद 

नको चर्च - गुरूद्वारा

एकमेका करू संग

तोच खरा भाईचारा


भुकेला धर्म नसतो

भुकेला प्रांत नसते

भुकेला भूक कळते 

भूकच फक्त जाणते


भुकेला काहीही म्हणा

भुकेशीच मतलब

भूक पोटाची भागता

कशाला पैशाची ऊब ?


प्रेम असेल निर्व्याज्य

प्रेमात देव भेटतो

प्रेमात जर का किंतू -

प्रेमात दैत्य भेटतो

@ कवी - सूर्यांबिका, सोलापूर

( सूर्यकांत ना.कामून )

मो.नं. 7620540722

Post a Comment

0 Comments