मे महिन्याचं रणरणतं ऊन होतं, अशा भर ऊन्हामध्ये दादा मी आणि मालू माझी बहिण आम्ही गोद्र्याला खास मावशीसाठी घर बांधायला गेलो आईने मातीच्या भेंडा वीटा खळ्याच्या वावरात पाडून ठेवल्या होत्या, दादाने मामाच्या घराशेजारी पायाची आखणी करून पाया खोदायला सुरूवात केली, दादा टिकावाने खोदत होता तर मी खोर्याने माती काढत होतो, अशा तप्ती ऊन्हात आमचा तो पराक्रम चालु होता पाया खोदायला जमिन खडकाळ असल्याने हाताला हादरे बसायचे तरीपण गुडघाभर पाया खोदला मावशी आणि मालूने उगल्यांच्या विहिरीवरून पाणी आणून टिप भरून ठेवली, घराच्या पाया भरणीला दादाने सुरूवात केली, मी गाळाचा माल तयार करून दादाकडं द्यायचो आणि दादा पाया भरायचा तिथल्या दगडी घेऊन त्या काटकोन व सांधामोड करून दादा लावत होता लहाण मोठे दगड परिसरातून वेचून मावशी आणि मालू आणून आमच्यापाशी ठेवत होत्या आणि मी त्या दगडी दादाला जशा लागतील तशा द्यायचो, आई आधीमधी पाणी आण कुठं लहाण दगडी दे असं करत होती, मागची एक पूर्ण भिंत दगडबांधकामात रचली आणि दोन भिंती मातीच्या विटांच्या रचल्या होत्या, मे महिना असल्याने ऊन भयानक लागायचं अशा ऊन्हात मालू मी आणि मावशी खळ्याच्या वावरात केलेल्या मातीच्या भेंडा विटा ऊरापोटाशी वाहून आणत होतो, आता विटांचं बांधकाम सुरू झालं होतं आम्ही दादाला गाळाचा माल अन् विटा देण्याचं काम सुरू केलं, मालू आणि मावशी दोघी विहिरीवरून पाणी आणत होत्या आणि मी दादाला गाळ द्यायचो खरं तर मला ते घमेलं उचलत नव्हतं अशा वयात मावशीच्या पढवीचं काम केलं होतं, जवळपास पंधरा दिवस मावशीच्या घराचं काम चालु होतं आता घर पूर्ण झालं होतं आणि पत्र्यावर काम आलं होतं पत्र्याला थोडा घराच्या लाकडाचा व्यत्यय येत होता ते लाकूड कापू नका असं सांगितल्याने ते तसचं ठेवून शेवटी पत्रा तेवढ्या मापाचा कापावा लागला आणि ते पत्रे बसवले.
अशा प्रकारे मावशीचं घर झालं.
लेखक - प्रा. सतिश शिंदे

Post a Comment
0 Comments