Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



  चारोळ्या 

सारखं खोटं बोलणं

खूप धोक्याचं असतं

सारखं खरं बोलणं

खूप चांगलं नसतं


खरं सांगायचं नाही

खोटं बोलायचं नाही

मग करू तरी काय -

तेपण कळेना काही


जगात बरंच काही

हाती काहीच लागेना

माझ्या हातीपण खूप -

पण हाती कां येईना ?


प्रेमात पडलो, आणि

सारं सारं विसरलो

मी कोण, कुठल्या जगी -

हेपण मी विसरलो


आपले शेजार हेच -

आपले ऋणानुबंध

सुखापेक्षा दुःखातच -

जोडू पाहती संबंध

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं . 07620540722

Post a Comment

0 Comments