चारोळ्या
प्रेम तुझ्यावर जर -
केले असते खुशाल
जगले असते मी रे
पळवून मृत्यूकाळ
ना मी तुझा, ना तू माझी
तरी कां मला पाहते ?
तुला ना कधी पाहिले -
तू कसे पाहिले होते ?
कमावलो जितका मी
वाटूनपण टाकलो
आत्ता चिंता ना काळजी
सुखासुखी मी जगलो
मी तर एक माणूस
जात माझी माणसाची
मग वागणूक माझी
झाली कशी गाढवाची ?
आपलं कुणी असावं
असं खुपदा वाटतं
जवळ करू पाहतो
जवळ कुणा ना येतं ?
कवी - सूर्यांबिका, सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं . 07620540722

Post a Comment
0 Comments