Type Here to Get Search Results !

जुन्नरमध्ये दिव्यांग मतदान जनजागृती अभियान



बुधवार दि. 30/10/24 रोजी सकाळी 11 वाजता जुन्नर तालुक्यातील  तहसिल कार्यालय  ,पंचायत समिती  ,जुन्नर नगर परिषद यांचे वतीने जुन्नर तालुका 195 विधानसभा मतदार संघ भागातील  दिव्यांग लोकांना एकत्र करत  दिव्यांग मतदान जनजागृती अभियान आयोजन  अंतर्गत श्रीमती पल्लवी घाडगे  निवडणूक निर्णय अधिकारी जुन्नर तालुका  मा.  डाॅ .सुनिल शेळके सहाय्यक निवडणूक अधिकारी  जुन्नर तालुका ,सचिन सुर्यवंशी गटविकास अधिकारी जुन्नर ,डॉ.अश्विनी कुलमथे नोडल अधिकारी, श्री संदिप भोळे  मुख्याधिकारी जुन्नर नगर परिषद श्री अनंता गवारी नायब तहसीलदार व संभाजी भांगरे  दिव्यांग कक्ष अधिकारी जुन्नर तालुका जिल्हा परिषद पुणे  यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुक्यातील  पंचायत समिती जुन्नर येथे आज दिनांक  30 /10/24 रोजी  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी जुन्नर तालुक्यातील दिव्यांग मतदार मोठया संख्येने उपस्थित होते .दिव्यांग  मतदारांना  मतदाना च्या दिवशी मतदान केंद्रावर व्हीलचेअर ची तसेच रॅम्प ची पिण्याच्या पाण्याची बसण्यासाठी सावलीची सोय करण्यात येणार आहे. दिव्यागं मतदारांना मतदान केंद्रावर जाण्या येण्यासाठी मदतनीस म्हणून स्वयंसेवक मदतीला उपस्थित रहाणार आहेत.या वेळी उपस्थित सर्व दिव्यांग व मतदारांना आवाहन केले मतदाना टक्का वाढवावा म्हणून मतदान करण्याची शपथ  सर्व उपस्थितानी घेतली याचे वाचन संभाजी भांगरे यांनी  केले.डॉ. अश्विनी कुळमेथे दिव्यांग कक्ष नोडल अधिकारी जुन्नर यांनी दिव्यांग मतदारांसाठी असणाऱ्या सोयी सुविधा ची माहिती दिली. गट शिक्षण अधिकारी श्रीमती  अनिता शिंदे तसेच   दिव्यांग लोकांना नेहमी सहकार्य करणारे श्री. जितेंद्र  बिडवई अध्यक्ष  डिसेंट फाऊंडेशन जुन्नर श्री  राजेश शेरकर  , श्री जयराम रावते आरोग्य विभाग सहाय्यक श्री भीमराव कसराळे मुख्याध्यापक मुकबधीर शाळा जुन्नर, हरिश्र्चंद्र वाणी तसेच जुन्नर तालुक्यातील दिव्यांग संघटना व संस्थेचे पदाधिकारी  श्री दिपक चव्हाण  , अरूण शेरकर  , सौ. पुष्पा ताई गोसावी ,ताहेरा  आत्तार.  ,श्रीहरी नायकोडी. श्री केरभाऊ नायकोडी  ,माणिकराव वाघचौरे, विजय शेळके,  हनुमंत थोरवे,  गणेश माताडे राहुल मुसळे  ,सुनिल जंगम,  गोरक्ष नरविर, गणेश शेटे, प्रभावती कानडे विमल संते वनिता भास्कर  यशोदाबाई कानडे आशाबाई देहाडे रोहिदास ठोगिरे व अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments