@ चारोळ्या @
आजचा अंधार हाच -
उद्याच्या सूर्याचा पत्ता !
आज अंधार पाहून -
खंत कशाला करता ?
अंधारीही वाट आहे -
शोधले की सापडेल !
पण आज उजेडात -
काही दिसेना सरळ !
वाट असू दे वाकडी
आपण करू सरळ !
वाटेलाच वाट देत -
वाटेला देऊ पाऊल !
कुठंवर देऊ साथ -
कुठंवर पाहू वाट ?
माझ्या पावलाखालची -
मलाच देईना वाट !
वाटेने चालत जाता -
वाट होई पायवाट !
पायवाट होता होई -
सुरू मग वहिवाट !
@ कवी- सूर्यांबिका , सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं . 07620540722
Post a Comment
0 Comments