Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



@ चारोळ्या @


टीकेला जो जो टिकतो

तोच टिकून राहतो!

जो घाबरूत जगतो -

तो जगूच ना शकतो !


या जगात कुणालाही -

त्रास न देता जगावं !

आणि जाता जातापण -

कल्याण करीत जावं !


कितीही सरळ चाला -

वळण घ्यावं लागतं !

वळणाविना जगणं -

जीण्यालायक नसतं ! 


समजून घेणा-यात -

कुणी तरी हवा एक !

समजून न घेणारे -

जगी तसे लाखोंलोक  !


माणसं वाचत जाता -

एकेक वेचत जावं !

काही वेचक वेधक -

आपल्याकडं ठेवावं !

 @ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना . कामून )

मो .नं . ०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments