Type Here to Get Search Results !

देव तारी त्याला कोण मारी मधु तारा प्रत्येक दिव्यागांच्या दारी



शिरूर तालुका प्रतिनिधी - सुरेश आप्पा गायकवाड 

दिनांक 7 नोव्हेंबर 2024 रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने पुणे दापोडी येथील रहिवासी ज्येष्ठ वृध्द माऊली श्रीमती शालूबाई विठ्ठल कांबळे यांच्या पायाला गेंग्रिन झाल्यामुळे गुडघ्याखालून पाय काढावा लागला असल्या मुळे त्यांना मोफत वॉकर त्यांच्या घरी जाऊन देण्यात आले. त्यांच्या कन्या सौ.राजश्री खरात यांना ज्येष्ठ दिव्यांग मधु ताराचे कार्यकर्ते श्री दिलीपजी सोनवणे यांनी मधु ताराचे प्रमुख यांचा संपर्क क्रमांक दिल्या मुळे आज रोजी मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे आणि मधु तारा पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे यांना ही सेवा करण्याचे भाग्य लाभले.

अस्क निराधार वृद्ध आश्रम हडपसर पुणे प्रमुख श्री दादा गायकवाड यांनी वॉकर साठी सहकार्य केले.

या वेळी मधु तारा प्रमुखांनी लवकरच पायाची जखम बरी झाल्यावर माऊलीना मोफत कृत्रिम पाय बसवू असे सांगितले.

या वेळी माऊली श्रीमती शालूबाई आणि त्यांच्या मुलांनी मुलींनी जावयी यांनी व शेजारील सर्वांनी मधु ताराच्या कार्याच कौतुक करत अनेक आशीर्वाद दिले.व आजपासून मधु तारा आमच्या सर्वांच्या हक्काची संस्था बनली आहे व इथून पुढे आम्ही सर्व जण मधु तारा सोबत राहून मधु तारा प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली  समाजातील रुग्ण दिव्यांग यांची सेवा करू असे जाहीर केले.

करता करविता परमेश्वर आपण फक्त नाम मात्र मधु तारा प्रत्येकांसाठी प्रत्येक जण मधु तारा साठी.

Post a Comment

0 Comments