Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



@ चारोळ्या @

देवळात नाही देव

स्वर्गातही नाही देव

माणसांना कंटाळून-

देव झाला त्राही त्राही


ना घर आपलं होतं

ना आपली ती माणसे

आपले म्हणालो पण -

घरची मोजली वासे


जगाच्या भीतीपोटीच -

चेहरा मी लपविला

उघडू पाहता तेंव्हा -

डोळा अंधार दाटला


वेळात वेळ काढून -

देव आम्हां घडवलं

आम्ही  मात्र देवाचंच -

देवत्वच नासवलं


आजवर जीवनात -

ना सुख ना समाधान

जगतोय कसाबसा

जगणं आहे म्हणून 

@ कवी - सूर्यांबिका ,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं . ०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments