Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



@ चारोळ्या @

देव , तुमचा आमचा -

असं कधीच नसतो!

देव , आपल्या सर्वांचा -

एकच एक असतो!


मनासारखं कुणाला -

कां नाही जगता येतं ?

इतरांच्या प्रवाहात -

प्रवाही कां होत जातं ?


भुकेने तडफडतो -

त्यासि रे भूक कळते !

तहानेने व्याकुळतो -

त्यासि तहान कळते !


आपण मरतो तेंव्हा -

नसते गादी - बिछाना !

मग जिवंत असता -

कशाला रे चांदी - सोना ?


काही हरवले गेले  

काही धुसरही झाले !

आज जे समोर माझ्या -

माझे नाहीच राहिले!

@ कवी - सूर्यांबिका, सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो . नं .   07620540722

Post a Comment

0 Comments