Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 

प्रत्येक चेह-यामागे - 

असे वेगळा चेहरा !

कळत नाही कधीच -

लपलेला तो चेहरा !


कुठे बापाने मुलाला -

कुठे मुलाने बापाला !

पाडापाडीच्या जगात -

महत्व आधी सत्तेला !


लोकांचा काय भरोसा ?

कोण कुठेही जातील !

आपण ठाम राहून -

मत मांडावं आपलं!


कालचा नव्हता ठीक -

आजचाही नाही ठीक !

उद्याचा दिवस मग -

आपला असेल ठीक ?


काही गोष्टीला आपण -

योगायोग म्हणू कसं !

काही गोष्टी मुद्दामच -

घडवत नाही कसं ?


सारखं मनात येतं-

उद्याला काय होईल ?

कुणा कसं कळेनासं -

आजचं कसं होईल ?


बरंच काही घडलं -

अजून काही घडतं !

घडणा-या गोष्टीतच -

चांगलं कां न घडतं ?

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना कामून )

मो .नं . ०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments