चारोळ्या
कलियुगातला वाल्मिकी -
वाल्या ' वाल्याच 'राहिला !
रामायणातला वाल्या -
वाल्याचा ' वाल्मिकी 'झाला !
सरकार म्हणते की-
गरिबांचं राज्य आहे !
मग गरिबांवरच -
अन्याय कां होतो आहे ?
आज जिकडे तिकडे -
गुंड आणि बदमाश !
सरकारच पोसते -
म्हणून हा सर्वनाश !
अन्न परब्रह्म आहे -
आज सारे विसरले !
अन्नाऐवजी सगळे -
मातीच खाऊ लागले !
दगडच खूप भारी -
कधी ना विरघळतो !
काळही कुठला असो -
कधीच ना बदलतो !
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं . 07620540722

Post a Comment
0 Comments