Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


सत्य सत्यच असते -

खोटे खोटेच असते !

खोटे उघडे पडाया -

सत्याला वेळ लागते !


सुसंस्कृत समाजाचा -

चेहराच बदलला !

रीतीभाती विसरून -

जो तो वावरू लागला !


ना कुठल्या मी जातीचा -

ना कुठल्या मी धर्माचा !

मी एक माणूस आहे -

फक्त माणूसजातीचा !


आपण म्हणतो खरा -

आपला कुणी नसतो !

आजच्या जगात फक्त -

जो तो आपले पाहतो !


आज शहाणा कळेना -

मुर्खही कोण कळेना !

सगळे एकसारखे -

कुणी ओळखू येईना !

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर 

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं .07620540722

Post a Comment

0 Comments