चारोळ्या
हवा कशाला देहाला -
नानाविध आभुषणे ?
इतका सुंदर देह -
त्यापुढे फिके दागिने !
फुलण्याआधी फुलांचे -
शोषिलो परागकण !
मी पापी हरामखोर -
देव कां नेईना प्राण ?
जगी पापी नाही असा -
सांगाल कां एकतरी ?
जर पापी भेटलाच -
दगड कां त्यासि मारी ?
नाही कुणाचे राहिले -
नाही कुणाचे उरले !
देणेघेणे हिशोबात -
देवा, मी चोख ठेविले !
देवा, तू सुख मापून -
दुःख गाळून दिलास !
समाधानानं जगाया -
मोकळं कां न दिलास ?
@ कवी - सूर्यांबिका, सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं . 07620540722

Post a Comment
0 Comments