Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


आग लावतोय त्याला -

कुठे माहित असतं ?

हवाच बदलली की -

आपलंही राख होतं !


सांगायचं तसं खूप -

सांगायचंच असतं !

पण आपला इमान-

सांगाया देत नसतं !


काहीपण करा पण -

योग्य तेच तुम्ही करा !

तुमच्या कर्तृत्त्वावर -

जगाच्या क्रुर नजरा !


आपल्याला वाटते की -

सारे आपल्याजवळ !

आपणा कळत नाही -

कां ते आपल्याजवळ ?


काय पाहू ,काय नको -

सौंदर्यच नष्ट झाले !

नको ते दृश्य पाहून -

डोळे कायमचे गेले !

@ कवी - सूर्यांबिका ,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून 

मो .नं . 07620540722

Post a Comment

0 Comments