अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत नाशिक जिल्हा शाखेने आयोजीत केलेले
१३ वे नवोदिताचें व ग्रामिण राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन सोमवार दिनांक ३० डिसेंबर रोजी
मोडाळे या ईगतपुरी तालुक्यातील राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित गावात मोठ्या उत्साहात पार पडले.
या संमेलनात पुण्यातील साहित्यिक दिलीप कजगांवकर यांनी सादर केलेल्या "वृध्दाश्रम" या कथेने उपस्थितांचे मन जिंकले. कथेतून दिलीप कजगांवकरांनी वृध्द तसेच तरूण पिढीला मोलाचा संदेश दिला.
वृध्दांनी नीट न ऐकणे तसेच व्यवस्थित समजून न घेणे हे गैरसमज होण्याचे कारण बनून अतिशय घातक ठरू शकते.
तरूण पिढीने मोठ्यांचा गैरसमज होईल असे काही करू नये, बोलू नये आणि वागू नये.
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते जगायचे असते आवडीने, निवडीने आणि सवडीने.
कथा सादर करताना दिलीप कजगांवकर

Post a Comment
0 Comments