चारोळ्या
सुंभ जळालं तरीही -
पीळ काही जात नाही !
तशी काहींची खोडही-
काही केल्या जात नाही !
खूप जगावं वाटतं -
द्यावं-घ्यावंही वाटतं !
घेणारे घेत राहिले !
देणारे देत नाहीत !
रडणारा रडतोय -
लढणारा लढतोय !
लुटणारा लुटतोय -
पाहणारा पाहतोय !
जीवनात आजवर -
खूप काही मी शिकलो !
जगाशी कसं वागावं ?
जगाकडून शिकलो !
आपल्या कामी आपली -
आवड निर्माण करा !
आवडीच्या कामासाठी -
सवडही काढा जरा !
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना.कामून )
मो.नं .०७६२०५४०७२२

Post a Comment
0 Comments