चारोळ्या
तेल नाही तरीपण -
दिवा जळतेच आहे !
दिव्याच्या ज्योतीत माझी -
काळजाची वात आहे !
काळीज काजळ झालं -
काजळ लावू कुणाला ?
सा-यांचेच डोळे छान -
सांगू कशी काळजाला ?
गाण्यात जीवही नाही -
सुरात लयही नाही!
माझी बेसूर जिंदगी -
पण रडकथा नाही !
जगी चांगलं कुणाला -
कधी पाहवत नाही !
चांगलं कराया पण -
कुणाला जमत नाही !
आग लागल्याशिवाय -
धूर निघत नसते !
आग लागल्याची मात्र -
संकेत देत असते !
माणूसपण संपलं -
माणुसकीही संपली !
माणूस नावाची बोट -
गटंगळाया लागली !
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं . 07620540722
Post a Comment
0 Comments