Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या


 चारोळ्या 


हे जगही बदलले -

नीतीमत्ता बदलली !

भाकरीच्या जागी पोळी-

आणि चव बिघडली !


खोटे किती बोलावेत-

त्यालाही मर्यादा आहे !

पण सध्याचा जमाना -

खोट्यांनी चालतो आहे !


कायद्याचं राज्य नाही -

कायदा गाढव झाला !

कायद्याने चालणारा -

कायदा मोडू लागला !


स्रियांच स्रियांच्या आज -

इतक्या कां हाडवैरी ?

आजच्या या स्रियांपेक्षा -

रामाची कैकयी बरी !


आजचा पुरूष आज -

पुरूषागत वागेना -

पुरूष असूनपण -

नपुसकाच्याच खुणा !

@ कवी- सूर्यांबिका ,सोलापूर

( सूर्यकांत ना . कामून )

मो .नं . 07620550722

Post a Comment

0 Comments