Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


देहाची केली मी वात -

आणि आयुष्याचं तेल !

सुखासुखी जगण्याला -

काळीज पणती केलं !


मैफल उठून गेली -

पेटून गेले झंबर !

सजणार पुन्हा कशी -

मैफलीचा अंत:स्वर ?


कधी मी असतो मूर्त -

कधी असत अमूर्त !

काळ असो कुठलाही -

पाहत नाही मुहूर्त !


कधी कधी माणसाला -

खोटं बोलावं लागतं !

संकट टाळण्यासाठी -

असं बोलावं लागतं !


कधी वाटते आपणा -

जिंदगीची घेतो मजा !

कधी कधी जिंदगीच -

आपलीच घेते मजा !

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना . कामून )

मो .नं.०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments