Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा प्रजासत्ताक दिनानिमित्त चारोळ्या



 चारोळ्या ( प्रजासत्ताक निमित्त )


आपला प्रजासत्ताक -

खरं प्रजेची कां सत्ता ?

प्रजासत्ताकात कसा -

प्रजेचा लागेना पत्ता ?


प्रजासत्ताक म्हणून -

अभिमानाने सांगतो !

प्रजासत्ताक देशात

प्रजाच लुटला जातो !


प्रजासत्ताक म्हणतो -

प्रजा हाती कुठे सत्ता ?

प्रजा केवळ नावाला -

नेत्या हाती सारी सत्ता !


प्रजासत्ताक म्हणजे -

राज्यही हवे प्रजेचे !

प्रजासत्ताकात मात्र -

हित दिसेना प्रजेचे !


आजचे प्रजासत्ताक -

कशाचे काही कळेना !

मोरांना दाणे देताना -

राजाला प्रजा दिसेना !


कुठे रे तो राजाभोज -

कुठे आपली ही प्रजा ?

राजा जगतो चैनीत -

दुःखात जगते प्रजा !

@ कवी - सूर्यांबिका , सोलापूर

( सूर्यकांत ना . कामून )

मो .नं .०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments