Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


असे किती पत्रकार-

सत्य तेच लिहिणारे ?

सत्य तेच सांगणारे -

सत्यधर्म पाळणारे ?


सत्य कुठेच दिसेना -

सगळेच अर्धसत्य !

सत्य सांगणारे पण -

सांगेनात कधी सत्य !


चुकीच्या दिशेने आज -

सगळेच चाललेत !

वाट चुकीची असून -

चुकीची धरती वाट !


संकटकाळी आपणां -

फक्त देव आठवतो !

आजारी पडतो तेंव्हा -

दवाखाना आठवतो !


चालायचे संपलेत -

पळायचे दिवस हे !

आत्ता पळायचे नाही -

चक्क धावायचे आहे !

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना . कामून )

मो .नं . 07620540722

Post a Comment

0 Comments