चारोळ्या
जगी आज माणसांना -
नानाविध नाना रोग !
कळत कधीच नाही -
कुणाला कुठला रोग !
जगी सगळेच छान -
माणूस तेवढा नीच !
जन्म माणसाचा पण -
वागणूक कां न स्वच्छ ?
जगी सर्व धर्मापेक्षा -
माणूस धर्मच श्रेष्ठ !
माणूस मग जातीचा -
कां आणू पाही आरिष्ट ?
माणसा कोण सांगवा ?
माणसा तूच माणूस !
तरी माणसा येईना -
माणूसपणाचा वास !
जग सुरेख सुंदर -
माणूसही खूप छान !
माणसाची नीती मात्र -
इतकी कशी रे घाण ?
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं . ०७६२०५४०७२२

Post a Comment
0 Comments