Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 

जगासवे जगताना -

जगणे ना वाटे मला !

माझ्यासवे जगताना-

जगल्याचे वाटे मला !


सर्वांचे स्वप्न असते

सर्वांत पुढे जायला ! 

परंतु पुढे जायला -

हवे पाय चालायला !


जगणेच धुकारले 

म्हणून जीणे अंधुक !

जगून पाहिलो तेंव्हा -

जगणे तेजाने लख्ख !


तसं जिंदगीने मला -

सगळंच काही दिलं !

आज उतारवयात -

असं कां दूर चाललं !


मरण अटळ आहे -

आज ना उद्या येईल !

मरण यायचे येवो -

जगायचे कां सोडतो ?

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना . कामून )

मो .नं।. 07620540722

Post a Comment

0 Comments