चारोळ्या
दिव्यातली मी रे वात -
मीच प्रकाशिते ज्योत !
मीच ना तर , दिव्याची -
तेवणार कशी ज्योत ?
कोण आले , कोण गेले -
कुणा कळलेचि नाही !
कसे आले , कसे गेले -
तेही कुणा ठाव नाही !
काळाला ओळखून जा -
काळच घेते परीक्षा !
चांगल्याला देते दीक्षा -
वाईटाला मात्र शिक्षा !
चांगले जर वाईट -
वाईटसुध्दा वाईट !
वाईटा नादी लागून -
कां बरे व्हावे वाईट ?
जीवाची केली मुंबई -
मुंबई नाही पाहिली !
कामासाठी माणसांची -
रोजची घाई पाहिली !
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यंकात ना . कामून )
मो .नं .07620540722

Post a Comment
0 Comments