चारोळ्या
जातीदंगलीत फक्त -
हिंदू नि मुस्लिम मेला !
नेता वा एखादा मंत्री -
दंगलीत कधी मेला ?
धर्माला गरज तेंव्हा -
एकत्र येतात जाती !
जातीला गरज तेंव्हा -
धर्म विचारते जाती !
राम तेरी गंगा मैली -
पापीयोंके पाप धोते !
गंगेत स्नान केले की -
पाप कां धुवून जाते ?
कुणी गैर असूनही -
परकं वाटत नाही !
कुणी आपलं असून -
आपलं वाटत नाही !
कुणाला कुणी आल्यानं -
खूप खूप सुखावतं !
कुणाला कुणी गेल्यानं -
दर्दनाक दर्द होतं !
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
(सूर्यकांत ना . कामून )
मो . नं . ०७६२०६४०७२२

Post a Comment
0 Comments