Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


असे कसे रे हे जग -

अशी कशी ही माणसे ?

नीट जगायलासुध्दा -

जगूही देईना कसे ?


आजचा माणूस आज

माणूसच कां वाटेना ?

माणूस म्हणूनपण -

माणूस कां म्हणवेना ?


लोक राहतात कसे -

जगी जगतात कसे ?

काहींना जगूनपण -

जगणे वाटेना कसे ?


जग आपले म्हणतो 

लोक आपले म्हणतो !

आपला म्हणतो तसं -

आपला कां न मानतो ?


इतकं सांगूनपण -

काहींची वाकडी वाट !

कारण काहींची वृत्ती 

वाटे कुत्र्याचं शेपूट !

@ कवी-सूर्यांबिका ,सोलापूर

( सूर्यकांत ना . कामून )

मो नं .07620540722

Post a Comment

0 Comments