Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


शिकल्यावर माणूस 

वकील - डाॅक्टर होतो !

माणूस म्हणून मग -

कां न तो होऊ पाहतो ?


आपण असतो तसं

जग कधीच नसतं !

जगाच्या मर्जीनुसार 

जग चालत असतं !


रोजच्या जगण्यातून

जीणे शिकून घेतलो !

जगणे काय असते ?

आज जगून पाहिलो !


कधी स्वीकारणे शिका 

कधी नाकारणे शिका !

चालता पडलं तर

स्वतः उठायला शिका !


विकला नसेल तर

माणसा किंमत आहे !

विकलाच गेला तर

मग कवडीचा आहे !

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो.नं .07620540722

Post a Comment

0 Comments