Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


सुख आपले हे सुख -

जगा सांगत जाणार !

दुःख आपले दुःख हे -

कुणा कुठे सांगणार ?


वाट फुलांचीच होती -

काट्यांनी कशी भरली ?

वाट स्मशानाची मात्र -

फुलांनी कशी सजली ?


सुखाला कसली चिंता ?

ढेकर देत झोपतो !

दुःखाला चिंता-काळजी -

घाम गाळत जगतो !


सुखाचे सोहळे झाले -

दुःखाचे डोहाळे झाले !

आत्ता जीवनात माझ्या -

नानाविध नाना मेळे !


फुलें वेचता वेचता -

काटेच काटे रुतले !

सुख मागता मागता -

दुःखच दुःख दर्दीले !

@ कवी -सूर्यांबिका ,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं .07620540722

Post a Comment

0 Comments