Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


जगतात तसे सारे 

फक्त जगावे म्हणून !

पण जगावेत कसे -

कळेना कुणा अजून !


कसेही जगती त्यासि -

जगणे कसे म्हणावे ?

जगा आणि जगू देतो -

यासि जगणे म्हणावे ! 


ना कुठली तिथीमित्ती -

ना कुठला रे मुहूर्त !

आपण सांगतो तेच -

समजा ब्रह्ममुहूर्त !


आज तर सत्यालाच -

नागवं केलं जातंय !

सत्य ओरडून पण -

कुणी ऐकेना झालंय !


आजच्या घडीला तर -

नास्तिक परवडला !

देवाचे नाव सांगून -

लुटावे तरी कशाला ?

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

 ( सूर्यकांत ना .कामून )

मो.नं. ०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments