चारोळ्या
नको कुणाचा ओलावा -
नको कुणाचा रे स्पर्श !
मीच माझ्या प्रयत्नाने-
माझा करीन उत्कर्ष !
कसला रे हा उल्हास ?
कसला रे हा जल्लोश ?
जीव कुणाचा जाताना -
कुणीच धावेना कसं ?
मनात आणलं तर-
माणूस काही करतो !
दगडाचे शिल्प तर -
मातीत मोती पेरतो !
कमळ चिखलातच -
किती छान उमलते ?
तरी तिच्या अंगोपांगी -
सांगा चिखल लागते ?
काट्यांत फु़लून येते -
सुंदर छान गुलाब !
काटेच नसेल तर -
कसा फुलेल गुलाब ?
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं .07620540722

Post a Comment
0 Comments