Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


माणूस म्हणून आलो -

माणूस कां न मी झालो ?

माणसात राहूनही -

माणूस कां न बनलो ?


ना मी माणूस पाहिलो -

ना माणुसकी पाहिलो !

माणसातला माणूस -

कधी ना शोधू शकलो !


जसा तो चांगला होता -

तसा तो वाईट होता !

पण माणूस म्हणून -

माणसाळला नव्हता !


माणसा,माणूस तर -

माणसासारखं वाग !

माणसासारखं जग -

माणसा,माणूस बघ !


जग माणसाचं पण -

माणूस कुठं दिसेना !

जागोजागी माणसेच -

माणूस कसा कळेना ?

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

 मो .नं .०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments