Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


सुंदर काय असतं ?

आपण बघतो तसं !

बघण्याचा दृष्टिकोन -

हवं तसं निरागस !


जगणे सोपे करून -

आपण जगाया हवे !

चेहरेपण सा-यांचे -

सहज वाचता यावे !


संघर्षाविना जिंदगी -

जिंदगी कधी नसते !

संघर्षातली जिंदगी -

खरी जिंदगी असते !


ब-याचदा बरेचसे -

खूप पकडता येते !

ब-याचदा बरेचसे -

सोडावेपण लागते !


चौफेर तटरक्षक -

जागोजागी चौकीदार !

तरी डोळा चुकवून -

घुसतोच कसा चोर ?


मोठ्या चोरांना सोडणे -

लहानांना पकडणे !

आजच्या राजनितीची -

मुख्यतः ध्येयधोरणे !

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना. कामून ) 

मो.नं. ०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments