चारोळ्या
जिंकायचे आहे तर-
आधी लढायला शिका !
हरण्याचे मात्र कधी -
भयच बाळगू नका !
जे जे होते सारे दिले -
हाती काही न उरले !
खेळ ऊन-सावलीचा -
कधी कळूही न आले !
आयुष्यभर जिंकून -
आज कसा कां हरलो ?
कुणाचा कुटील डाव-
हराया निमित्त झालो !
तुझंसुध्दा बरोबर -
माझंसुध्दा बरोबर !
पण चुकतंय कुठं -
कां कळेना खरोखर ?
अमृताच्या झाडालाही -
आज विषाची कां फळें ?
म्हणून हल्लीच्या जगी -
हेच कां पहाया मिळे ?
जगी इथे प्रत्येकांची -
एक औरच कहाणी !
काहींची रसभरीत -
काहींची दर्दिली गाणी !
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना. कामून )
मो.नं. 07620540722
Post a Comment
0 Comments