@ रंगपंचमी @
रंगात रंगूनपण -
नाही कधीच रंगलो !
रक्तरंगाचे खेळच -
जगी मी पाहू लागलो !
रंगात खेळतो कोण -
रंगात रंगतो कोण ?
रंगात रंगून आज -
रंगात नाचतो कोण?
रंगच बेरंग होता -
रंग रक्तरंग झाला !
रंगात कुणी खेळेना -
रक्ताचाच रंग केला !
आजची रंगपंचमी
नव्हे दंगलपंचमी !
राग-द्वेष , मत्सरांनी
बेधुंद आज पंचमी -
पंचमी म्हणू कसली -
रंगच दिसेना जिथे ?
रंगाच्या ठायी दिसते -
खुनाखुनी जिथेतिथे !
@ कवी - सूर्यांबिका ,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं . ०७६२०५४०७२२
Post a Comment
0 Comments