प्रतिनिधी : सुरंजन काळे
घोडेगाव प्रतिनिधी -एकहाती तिकीट वसुली करून प्रवासी विनातिकीट जाऊ न देता चक्क अवघ्या आठ तासात १,०१,४०२ रुपये वसूल केल्याबद्दल पीएमपीचे वाहक कुंदन काळे यांच्या कामाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. काळे यांचा गुरुवारी (दि. १ मे) महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योजक डॉ. मेहबूब सैय्यद यांनी दिली. कुंदन काळे पीएमएमएल मध्ये कंडक्टर म्हणून काम करत आहेत. तसेच ते आमदार महेश दादा लांडगे यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात सामाजिक कार्यामध्ये भोसरी या ठिकाणी वास्तव्य करत असताना आपल्या गावाचे नाव देखील मोठे करत असतात काळे यांच्या अथक परिश्रमामुळे १५ ऑगस्ट रोजी एकही प्रवासी विनातिकीट प्रवास करू शकला नाही. त्यांच्या या कामगिरीची चर्चा संपूर्ण प्रशासनामध्ये होत आहे. मागील वर्षीच्या रक्षाबंधन आणि सुट्टीमुळे प्रवाशांची संख्या वाढल्याने १५ ऑगस्टला तिकीट विक्रीत मोठी वाढ झाली होती. या दिवशी अवघ्या आठ तासांत काळे यांनी तब्बल १,०१,४०२ रुपये वसूल केले. विशेष म्हणजे संपूर्ण डेपोतील ५० कर्मचाऱ्यांनी एकत्र मिळून १५ लाख रुपये वसूल केले. मात्र काळे यांनी एकट्याने १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला.
भोसरी डेपोमध्ये तब्बल ११ वर्षांपासून कार्यरत असलेले काळे यांनी या यशाचे श्रेय त्यांच्या विशेष कौशल्यांना दिले.
Post a Comment
0 Comments