Type Here to Get Search Results !

नीलपुष्प काव्यसंध्या आणि गझल कार्यशाळा एक आनंददायी सोहळा



ठाणे: रविवार दिनांक ६ एप्रिल २०२५ एकीकडे आज रामनवमीचा उत्सव सुरू असतानाच नीलपुष्प साहित्य मंडळ ठाणे आणि वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्याच्या आनंद विश्व गुरुकुल प्रांगणात सांगलीचे सुप्रसिद्ध गझलकार सिराजभाई शिकलगार यांची गझल मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. 

सुरुवातीलाच पाहुण्याच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. आणि निवेदिका निलम शेलटे यांनी सुप्रसिद्ध गझलकार सिराजभाई शिकलगार यांचा सुंदर असा परिचय करून दिला. त्यानंतर राजेश साबळे ओतूरकर अध्यक्ष नीलपुष्प आणि प्रा. नागेश हुलवळे संस्थापक वर्ल्ड व्हिजन यांनी दोन्ही संस्था तसेच सौ सावित्री ताई झांबरे आणि तानाजीराव झांबरे यांच्या तर्फे सिराज शिकलगार सरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यानंतर गझलकार सिराजभाई यांनी आपल्या ओघवत्या भाषेत अतिशय छान असा काव्य, कथा, लेख, साहित्य आणि गझल या एकाच आहेत. त्यात कोणीही डावे उजवे करू नये. असे आणि समजण्याचे कारण नाही. कारण चांगले काव्य करता आले तरच चांगली गझल लिहिली जाते. गझल हा कवितेचच प्रकार आहे. कोणी ही गझलकार इतर कवी, लेखक साहित्यिकांपेक्षा मोठा नाही. किंवा गझल कवितेपेक्षा वेगळी आणि मोठी आहे असे समजण्याचे कारण नाही. 

हे सांगत असताना गझल रचनेतील काही बारकावे अगदी सध्या शब्दात सांगून गझलेतील पहिल्या दोन ओळी म्हणजे काय? त्यातील मात्रा कशा मोजतात.. दोन ओळींचा एक शेर आणि दोन दोन ओळींची पाच कडवी म्हणजे एक गझल.

यात यमक, कसा साधावा काफिया, लतिफ याबदल माहिती देत असताना गझलेत समोरच्या व्यक्तीला गाफील ठेवून दीड ओळीनंतर शेवटच्या टप्प्यात टाळी कशी मिळवावी याचे तंत्र सांगितले. 

लेखनामध्ये आपले स्वतःचे दुःख किंवा स्वतः बद्दल लिहिणेपेक्षा इतरांची वेदना आपल्या काव्यातून किंवा रचनेतून आपल्या लेखणीतून समाजासमोर मांडावी म्हणजे त्याचा जास्त परिणाम होतो.

आता मोबाईलच्या जमान्यात आपले पुस्तक विकत घेऊन कोण वाचणार आहे. म्हणून आपली लेखणी दमदार असली पाहिजे..

त्यासाठी त्यांनी खेळाचे उदाहरण दिले. ते म्हणाले... मैदानावर क्रिकेटचा सामना सुरू आहे. आणि खेळणारे पटपट आऊट होत आहेत. तर आपल्याला आनंद होईल का? कसे वाटेल. त्यामुळे काही तर रागाने टीव्ही सुद्धा फोडतात. पण तोच खेळ दमदार खेळून प्रेक्षकांची उत्कंठा वाढवून अगदी दोन किंवा तीन रन कमी पडून खेळात हार जीत झाली तर मनाला आत्मिक समाधान मिळते. नाही तर जे क्रिकेटच्या खेळाचा राग आल्यावर लोक आपला किंमती टीव्ही फोडतात. तसे आपले पुस्तक बाजूला फेकून देतील. त्यात रसिकाला खिळून ठेवील असे लेखन असायला पाहिजे.

 पिके करपून गेल्यावर पाऊस आला किंवा शेतात पीक बहररातात आलेले असताना आणि अचानक पाऊस आला आणि सर्व वाहून गेले. तर त्या पावसाचा काय फायदा.

हे कवितेतून सांगताना समोरच्या गाफील कसे ठेवले पाहिजे. 

हे एक उत्तम उदाहरण पहा...

*चमकून वीज गेली, आभाळ दाटल्यावर...*

*पाऊस खूप पडला, काळीज फाटल्यावर...*

दुसरी एक गोष्ट मनाला भावली ती म्हणजे आपल्या आजुबाजूला काही घडले आहे हे तसे लवकर कळत नाही. पण आठ दहा मैल प्रवास करून आलेली घरातील मुलगी जेव्हा संबधित घरी येते तेंव्हा ती घराच्या बाहेर अंगणात पाय ठेवल्या बरोबर हंबरडा फोडते. तेंव्हा आपल्याला कळते तिथे काय झाले आहे. याची कल्पना येते. आता त्याच घरात चार दोन मुलगे असतील पण ते असा हंबरडा फोडत नाहीत. मी कसा रडू माझी प्रतिष्ठा, हुद्दा आणि जरी रडला तरी त्याची तीव्रता कमी असते. 

अशा अनेक गोष्टीची खुप छान माहिती सिराज शिकलगार सर यांनी दिली. खुप समाधान वाटले .

 आमच्या नीलपुष्प सदस्या सौ सावित्री ताई झांबरे आणि त्यांचे पती तानाजीराव झांबरे या दोघा उभयतांनी हा सुंदर योग जुळून आणला. सिराज सर, हे सौ सावित्री ताई झांबरे यांचे मानसमामा. सांगली जिल्ह्यातील मुपो आंधळी हे त्यांचे गाव एवढ्या दूर वरून तीनशे साडे तीनशे मैल प्रवास करून आलेले सिराज शिकलगार सरांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे. एप्रिल महिन्यातही भर दुपारी एक वाजता भर रणरणत्या उन्हात त्यांचे आगमन झाले. 

यावरून त्यांचे साहित्य विषयाचे प्रेम दिसून येते. त्याचा चाहता वर्गही खुप मोठा आहे. सर येणार म्हणून ठाणे, भिवंडी, उल्हासनगर , डोंबिवली, पालघर, बोरिवली, बदलापूर येथून रसिक प्रेक्षक आले होते. 

खुप छान मार्गदर्शन आणि गझलचा आस्वाद घेता आला. त्यासाठी मा. सिराज शिकलगार सरांचे मनापासून आभार!!!

सौ सावित्री ताई झांबरे आणि तानाजीराव झांबरे प्रा नागेश हुलवळे सर आणि आमचे नीलपुष्प मंडळातील सर्व सदस्य यांना मनापासून धन्यवाद!!! आपल्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला शोभा आली.

आपले सर्वांचे खुप छान सहकार्य लाभत असल्यामुळे आपण असा सुंदर उपक्रम करू शकलो. ही श्रेय सर्वांचे आहे हे विसरून चालणार नाही. डॉ नारायण तांबे यांनी घालून दिलेला वसा आणि वारसा नेटाने पुढे नेण्यात आपला सिंहाचा वाटा आहे. एकट्याने काहीही होत नाही. 

म्हणूनच म्हणतात ना. *एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ*

त्यानंतर नीलपुष्प काव्यसंध्या सुरू झाली. अर्थातच या काव्य संध्येची सुरुवात मा. सिराज शिकलगार सरांच्याच गझलने झाली. त्यात ज्येष्ठ साहित्यिक नरेश पाटील, डॉ अनुपमा पाटील, प्रा जया राव, प्रा मीनाताई कुलकर्णी, शैला गिरनारकर, शामला वाईकर, प्रा. सुरेश डुंबरे, आनंद रांजणे, लक्ष्मण माळी, अभिमन्यू शिरसाट, शिवदास वाव्हळ, प्रा नागेश हुलवळे, सरोज गाजरे निलम शेलटे, सावित्री ताई झांबरे, कमल अस्वले आणि त्यांच्या मातोश्री, भरत कवितके (पत्रकार साहित्यिक, कवी), ह भ प रविंद्र कारेकर, निवृत्ती कोरडे (जुन्नर) हरिश्चंद्र मिठबावकर, संदीप कांबळे, उदय क्षीरसागर, मास्टर राजरत्न राजगुरू, शाहीर किरण सोनवणे, मोहनदास, मोरेश्वर बागडे, विश्वास पटवर्धन आणि राजेश साबळे ओतूरकर यांच्या कविता आणि गझल सदर होऊन शेवटी सरांचा आभार मानून या सुंदर सोहळ्याची सांगता झाली. दुपारी १ वाजल्या पासून सायंकाळी ७ वाजे पर्यंत असे सलग पाच तास एका ठिकाणी खिळून ठरणारा हा कार्यक्रम म्हणजेत दुग्धशर्करा योग असे म्हणावे लागेल.

आज रामनवमीचा निमित्ताने हा सुंदर सोहळा घडवून आणला त्या सौ सावित्री ताई झांबरे आणि तानाजीराव झांबरे यांचे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन सांगलीवरून आगमन झालेले गझलकार सिराजभाई शिकलगार तसेच या कार्यक्रमासाठी माईक सिस्टीम उपलब्ध करून देणारे विनोदी कलाकार आमचे नीलपुष्पचे ज्येष्ठ कवी डॉ नारायण तांबे यांच्या काळापासून ३० वर्षे सेवा सातत्य टिकून ठेवणारे विश्वास पटवर्धन आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे छाया चित्रण आणि चहा पाणी व्यवस्था ज्यांनी केली त्या सौ सावित्री ताई झांबरे आणि तानाजीराव झांबरे यांचे पुनश्च एकदा मनापासून विशेष आभार!!

धन्यवाद!!!

.......................................

राजेश साबळे, ओतूरकर 

नीलपुष्प ((ठाणे)

Post a Comment

0 Comments