Type Here to Get Search Results !

निरंकारी मिशनच्या सेवादारांकडून पालखी मार्गाची स्वच्छता संपन्न...



प्रतिनिधी | सुरंजन काळे

आळंदी (पुणे) : २० जून २०२५ : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान ठेवल्यानंतर शुक्रवारी २० जून २०२५ रोजी दोन्ही पालख्या पिंपरी चिंचवड शहरातून पुण्याकडे रवाना झाल्या. 



या दरम्यान पालखी मार्गामध्ये खूप कचरा जमा होत असतो. संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून दोन्ही पालखी मार्गावर सकाळी ११ वाजल्यापासून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.जसजशा पालख्या पुढे सरकत होत्या तसतसे मिशनचे सेवादार पालखी मार्गाची स्वच्छता करत होते. या स्वच्छता अभियानचे नियोजन पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतर्फे करण्यात आले होते. 



निरंकारी मिशनचे सेवादार हजारोंच्या संख्येने या अभियानामध्ये सहभागी झाले होते.

निरंकारी सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या लोकमंगलकारी व दूरदर्शी नेतृत्वाखाली मिशनच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार वेळोवेळी स्वच्छता अभियानसारखे उपक्रम राबविले जातात.



Post a Comment

0 Comments