Type Here to Get Search Results !

कवी सुरेश शिर्के लिखित काव्य सांजवेळ

 


सांजवेळ


दूर क्षितिजावरती 

संध्या छाया पसरली

वाटे ती सौंदर्यवती

रंगासंगे नटलेली...१


हळूवार चाललेली

छमछम पवलांनी

हृदयात भरलेली

एक स्थंभित कामिनी...२


लाल लाल गाल तिचे

केस असे काळेभोर

नयनांत बसलेली

अनमोल चित्तचोर...३


पहातच रहावे ती

मनमोही सांजवेळ

स्मरणाच्या दालनात

जशी मौल्यवान शाल...४


सुरेश शिर्के

खारघर,पनवेल

Post a Comment

0 Comments