Type Here to Get Search Results !

नगदवाडी शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षक वृंदांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार.



नगदवाडी तालुका-जुन्नर,जिल्हा-पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षक वृंदांच्या सत्कार सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले.अशी माहिती केंद्रशाळेचे मुख्याध्यापक सखाराम शेंडकर यांनी दिली.

सत्कार सोहळ्यात नगदवाडी गावात शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात ज्ञानदानाचे अखंड काम करत विद्यार्थी घडविणाऱ्या,विद्यार्थ्यांवर उत्कृष्ट संस्कार करणाऱ्या,विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या सर्व मार्गदर्शक शिक्षक वृंदांचा शाल देऊन तसेच मिठाईचे पाकिट देऊन शाळा व्यवस्थापन समिती नगदवाडी,शाळा सल्लागार समिती नगदवाडी,शिक्षक पालक संघ,माता पालक संघ व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.



सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे, जुन्नर तालुका खरेदी संघाचे माजी अध्यक्ष अशोक बढे,ग्रामपंचायत सदस्य निलेश बढे,शाळा सल्लागार समितीचे अध्यक्ष सुरेश बढे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश बढे,उपाध्यक्ष भावना बढे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संगीताताई बढे, दिपाली जाधव,महेश बढे,रघुनाथ बढे,रविन्द्र काळे,संतोष बढे, विलास बढे,बाबाजी बढे,दयानंद बढे,पिराजी भोर पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुख्याध्यापक सखाराम शेंडकर,दिपक घाडगे,शिक्षक मंगेश मेहेर,पंडित चौगुले,निलेश शेलार,सुप्रिया अभंग,विद्या वाघ,आशा आरेकर,उज्वला कांबळे,दिलीप तोतरे,राजेश जाधव,संकल्प चासकर,संगिता गाडेकर व अनिल गुंजाळ यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे नियोजन शाळा व्यवस्थापन समिती नगदवाडी,शाळा सल्लागार समिती नगदवाडी,शिक्षक पालक संघ व माता पालक संघ यांच्या वतीने करण्यात आले.

Post a Comment

0 Comments