सहा ऋतूंचे सहा सोहळे ("षडाक्षरी")
सहा ऋतूंचे ह्या
सहा ते सोहळे
आठवणींना त्या
देतात उजाळे...१
शिशिर ऋतूची
गुलाबी ती थंडी
पानगळ त्याची
देते नव घडी...२
वसंत बहर
देतसे आनंद
उत्साहाचे येणे
चैतन्याची साद...३
ग्रीष्म रखरख
वर्षा रिमझिम
येते हिरवळ
मोद पडघम...४
हेमंताची साद
लख्ख प्रकाशाची
शरद चांदणं
शोभा आकाशाची...५
सुरेश शिर्के
खारघर,पनवेल

Post a Comment
0 Comments