"बाप्पाचे आगमन"
मनी आनंद दाटूनी आला
माझा बाप्पा घरी वाजत गाजत आला
दारी मंडप सजला
सडा रांगोळ्यांनी ओटा सजला
परसबागेतील जास्वंद फुलला
जणू बाप्पा मोरयाची प्रतिक्षा करू लागला
हरळी दूर्वा वेली जाऊ लागला
पुरणपोळी,लाडू ,मोदक, पेढा यांचा नैवेद्य दाखवला
धूप,कापूर, अगरबत्तीचा सुगंध दरवळला
बाप्पाच्या कंठी हार माळला
बाप्पाच्या दर्शनासाठी पाहुण्यांचा मेळा जमला
दररोज बाप्पा मोरयाला नवनवीन पदार्थ तयार होऊ लागला
घराघरात आरतीचा नाद घुमू लागला
बालगोपाल प्रसाद नी सुट्टीचा आनंद लुटू लागला
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया असा जयघोष करू लागला
लहानथोरांना आनंद झाला
माझ्या मनी आनंद दाटूनी आला
माझा बाप्पा थाटामाटात विराजमान झाला.
कवयित्री -सौ पल्लवी निलेश रासकर.
श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर.
Post a Comment
0 Comments