कवितेचे नाव-"माझा देश माझी शान"
भारत माझा देश महान
उंच उंच करू त्याची मान
किती जरी घेतले आम्हां
भारतीयांचे प्राण
नाही झुकणार कधी
शत्रु ने दाखविला जरी बाण
कितीही आक्रमण केले
भारत मातेच्या मुकुटावर
नाही हा सैनिक गप्प बसणार शत्रूला गारद केल्याशिवाय धरतीवर
देव देश धर्म जपण्या सर्व सैनिक सज्ज आहे या धरणीवर
रामराज्य आले या भारतभूमीवर
पहेलगाम मध्ये ज्यांनी झेलल्या गोळ्या छातीवर
म्हणूनच भारत भूमीने केला हवाई स्ट्राइक त्यांच्यावर
ज्या मातेचे कुंकू पुसलेले होते कपाळावर
त्या मातेला लक्षात ठेवूनच केले यशस्वी ऑपरेशन सिंदूर पीओकेवर
धन्य धन्य ते भारत मातेचे लष्कर
नेहमीच सज्ज असतात पाठीवर घेऊन संरक्षणाचे दप्तर.
कवयित्री-प्रा. सौ पल्लवी निलेश रासकर.
श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर.
Post a Comment
0 Comments