रोटरी क्लब नारायणगाव ता.जुन्नर जि.पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५ /२६ मध्ये इ.१० वीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना "रोटरी एज्युकेशन ॲप" चे मोफत वितरण हिवरे तर्फे नारायणगाव येथील श्री.कुलस्वामी खंडेराय विद्यालयात करण्यात आले.अशी माहिती रोटरी क्लब नारायणगावचे अध्यक्ष स्वप्निल जुन्नरकर यांनी दिली.
जुन्नर तालुक्यातील श्री.कुलस्वामी खंडेराय विद्यालय हिवरे तर्फे नारायणगाव,शिवनेर विद्यालय आर्वी,ज्ञानदा माध्यमिक विद्यालय मंगरूळ,न्यू इंग्लिश स्कूल नगदवाडी,जयहिंद इंग्लिश स्कूल कुरण या विद्यालयातील इ.१० वीच्या २०० विद्यार्थ्यांना रोटरी क्लब नारायणगावच्या वतीने प्रत्येकी सुमारे सोळाशे रुपये किमतीचे "रोटरी एज्युकेशन ॲप" मोफत वितरीत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब नारायणगावचे अध्यक्ष स्वप्निल जुन्नरकर होते.यावेळी ग्रामोन्नती मंडळ हिवरे तर्फे नारायणगावचे अध्यक्ष डॉ.प्रविण शिंदे,रोटरीचे माजी अध्यक्ष मंगेश मेहेर,हेमंत महाजन,प्रोजेक्ट डायरेक्टर अनिता शिंदे,सेक्रेटरी प्रशांत ब्रह्मे,तेजस वाजगे,कुलस्वामी खंडेराय विद्यालयाचे मुख्याध्यापक तबाजी वागदरे आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.
"आयडियल स्टडी ॲप" हे शैक्षणिक ॲप अँड्रॉइड मोबाईल,टॅब व डेस्कटॉप मध्ये सहजपणे वापरता येते.या ॲपमुळे विद्यार्थ्यांचे विषयनिहाय, घटकनिहाय अध्ययन सहज व सोपे होण्यास मोलाची मदत होणार आहे.हे ॲप मराठी,सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे.यावेळी रोटरीचे अध्यक्ष स्वप्निल जुन्नरकर,डॉ. प्रविण शिंदे,मुख्याध्यापक तबाजी वागदरे यांनी मनोगत व्यक्त केले. तर रोटरीचे हेमंत महाजन यांनी या ॲपविषयी सविस्तर माहिती सांगून ॲप वापरण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत महाजन यांनी केले.सूत्रसंचालन विद्यालयातील भगवान काशीद यांनी केले तर रोटरीचे सेक्रेटरी प्रशांत ब्रह्मे यांनी आभार मानले.
Post a Comment
0 Comments