Type Here to Get Search Results !

कवी प्रा. पल्लवी रासकर लिखित काव्यरचना "माझी ज्ञानेश्वर माऊली"



"माझी ज्ञानेश्वर माऊली"

        

    माझी ज्ञानोबा माऊली 🚩

साऱ्या वारकरी सांप्रदायाला पावली 

अवघ्या विश्वाचा उद्धार करण्या धावली

प्रत्येक वारकऱ्यांच्या तोंडी म्हणूनच सदा माऊली माऊली 

अखंड जगाची जणू ती सावली 

समाज प्रबोधनासाठी त्यांनी भावार्थदीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी लिहिली 

ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायात तुम्ही आम्हा धर्म रक्षणाची शिकवण दिली 

अशी माझी ज्ञानोबा माऊली मला या मनुष्य जन्मात लाभली 

विठूच्या दर्शनाची आस तुम्ही आम्हा दावली 

आषाढी एकादशीच्या वारीत प्रत्येक वारकऱ्यांच्या मुखात सदा माऊली माऊली🚩

हरिपाठाची रचना करून तुम्ही आम्हा भक्तांना हरी मुखे म्हणायची गोडी लावली 

साहित्यरचनेत तुम्ही आम्हा दृष्टांत स्वरूपात विज्ञानाची आणि अध्यात्माची ओढ लावली 

मनुष्यजन्मात संसाराबरोबर परमार्थाची आवड व महती तुम्ही आम्हा सांगितली

वारकरी दिंडीत आणि वारीत लहान असो वा थोर प्रत्येकास म्हणतात माऊली माऊली 🚩

अशी माझी ज्ञानराज माऊली🙏

        

कवयित्री-प्रा.सौ पल्लवी निलेश रासकर.

  श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर.

Post a Comment

0 Comments