प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर
पेठ: आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारावरील प्रत्येक गाव, वस्त्यांमध्ये भाविक भक्तांच्या प्रचंड उपस्थितीसह नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे.
थुगाव माळीवाडीतील बालमित्र नवरात्रोत्सव, थुगाव येथील मुक्तादेवी नवरात्रोत्सव, कुरवंडी येथील चोंभादेवी नवरात्रोत्सवास भाविकांचा प्रचंड उत्साह दिसत असून शिवसेना जिल्हा समन्वयक, स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा. सुरेखाताई निघोट, स्वाभिमानी मराठा महासंघ जिल्हाप्रमुख प्राचार्य अनिल निघोट यांनी येथील महाआरती घेऊन भाविकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
दिवसभर आपल्या शेतात, कामाच्या ठिकाणी केलेले काबाडकष्ट विसरुन भक्तीभावात तल्लीन करणारा देवीचा नवरात्रोत्सव म्हणजे सर्व समाजास सुख दुःख बाजूला ठेवून एकत्र आणून एकतेचा संदेश देतो, देवीने सर्वांनाच सुखसमृद्धी व उदंड आयुष्य द्यावे असे आवाहन प्रा सुरेखाताई निघोट यांनी करून सर्व मंडळांचे भव्य असा ऊत्सव आयोजित करुन महाआरतीचा मान प्रत्येक वर्षी देत असल्याबद्दल मंडळांना धन्यवाद दिले.




Post a Comment
0 Comments