Type Here to Get Search Results !

जुन्नर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी सचिन मुळे यांची निवड



जुन्नर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी सचिन मुळे,उपसभापतीपदी सविता कु-हाडे,मानद सचिवपदी जितेंद्र मोरे,खजिनदारपदी सुभाष दाते,सरचिटणीसपदी उमेश शिंदे,सहचिटणीसपदी दत्तात्रय हांडे,लोकल ऑडिटरपदी विठ्ठल घोडे व जयसिंग मोजाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.जुन्नर येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात निवडी व सत्कार संपन्न झाले.



जुन्नर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आर्थिक गरजा सहजपणे भागवणारी,35 लक्ष रुपयांपर्यंत जामिनकी कर्ज सहजपणे देणारी,सभासदांच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्यांच्या वारसदारांना 30 लक्ष रुपये विनाअट मदत देणारी,सतत ऑडिट वर्ग 'अ' असणारी १०२ वर्षांची ही पतसंस्था संपूर्ण राज्यात आदर्शवत काम करणारी पतसंस्था आहे.



या निवडीवेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख मंगेश मेहेर,जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे,तालुका अध्यक्ष रमाकांत कवडे,माजी अध्यक्ष उपेंद्र डुंबरे,रविंद्र वाजगे,कार्याध्यक्ष वैभव सदाकाळ,शिक्षकनेते विश्वनाथ नलावडे,सरचिटणीस प्रभाकर दिघे,महिला आघाडी अध्यक्षा शुभदा गाढवे,माजी सभापती विजय लोखंडे,संतोष पाडेकर,अनिल कुटे,माजी उपसभापती दत्तात्रय घोडे,अविनाश शिंगोटे,सुनिता वामन,संचालक अंबादास वामन,नानाभाऊ कणसे,पुनम तांबे,दिलीप लोहकरे,बाळू लांघी,ज्ञानदेव गवारी,शिक्षक संघाचे पदाधिकारी रामदास संभेराव,भरत बोचरे,सदू मुंढे,सुनिल हाडवळे,संदिप थोरात, शांतारामबापू डोंगरे,तानाजी तळपे,दिनेश मेहेर,संतोष पानसरे,सुरेश गडगे,राम वायळ,वैशाली कुऱ्हाडे,उर्मिला वाजगे,स्वाती मुळे,सविता घाडगे,मिलिंद औटी,प्रदिप डोंगरे,गुणवंत इंगळे, सुनिल पाटील,रंगनाथ पवार,विजय नागरे,निलेश सरोदे,निलेश ढवळे,रुपेश पवार,चेतन सातपुते,दिपक पाचपुते,अनिल देठे यांसह शिक्षक संघाचे पदाधिकारी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नूतन पदाधिकारी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पतसंस्थेचे माजी सभापती संतोष पाडेकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments